कोंढावळ येथे ना.छगनराव भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
कोंढावळ- दि. १६ | राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष नामदार छगनराव भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा फुले अपंग सेवाभावी प्रतिष्ठान महा राज्य व समता परीषद यांच्या वतीने कोंढावळ सह परिसरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी सकाळी कोंढावळ येथे कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आले. गावातून या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते शाहू, फुले, आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कोरोना काळात गेल्या दोन वर्षा पासून डॉक्टर व त्यांचे सहकारी , आशा वर्कर यांनी या परिसरात अविरत उत्कृष्ठ सेवा दिली म्हणून त्यांचा कोरोनायोद्धा म्हणून वडाळी येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांना गौरविण्यात आहे.
त्यानंतर संध्याकाळी ४वाजता उभादगड ता. शहादा येथे अन्न, धान्य, वाटप व वृक्षलागवड कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उभादगड नागरिकांनी समाधान व्यक्त केले कोंढावळ, वडाळी, उभादगड येथील विविध कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हा समन्वयक तथा जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी, समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वाघ ,राष्ट्रवादीचे शहादा शहर अध्यक्ष सुरेंद्र कूवर, तालुका अध्यक्ष माधवराव पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष संजय खंडारे, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष जगदीश माळी, प्रगतिशील युवा शेतकरी भूपेंद्र जगताप, हेरंब ट्रस्ट अध्यक्ष हिरालाल माळी, सामाजिक कार्यकर्ते भगवान माळी, माचिंद्र माळी,
राष्ट्रवादी युवक शहादा तालुका उपाध्यक्ष ललित गोसावी, जिल्हाध्यक्ष संजय खंडारे, प्रगतिशील शेतकरी नथा रोकडे, सरपंच प्रतिनिधी लक्ष्मण ईशी, शिवकृपा पाणीवाटप संस्थेचे अध्यक्ष लालचंद माळी, पोलीस पाटील सुरेशगिर गोसावी, प्रकाश अहिरे, गोपाल कुवर, छोटू ठाकरे, भगवान माळी, मच्छिंद्र माळी, जि. प. मुख्याध्यापक मनोहर पाटील, पंढरीनाथ धनगर सर, कोंढावळ जि.प. मराठी शाळा शिक्षक वर्ग, पंकज अहिरे, सागर आहिरे, जितेंद्र महाले, विजय वाल्हे, मनोज रोकडे सर मातोश्री हॉस्पिटल चे डॉक्टर नंदलाल चौधरी , दिनेश माळी, देवा माळी, सचिन पटेल, रुबदास भिल, केशव भील, सुदाम भील, कोंढावळ येथील आशा वर्कर, जयनगर येथील उपसरपंच सुनील माळी, बँक मित्र अशोक खलाने, अतुल माळी, कैलास सैदाने सर जगदीश माळी, रवी भील, नाना भील, नरेंद्र सोनवणे, जयेश निकम, पंकज अहिरे, जितेंद्र महाले, भैरव झालटे, भरत माळी व वडाळी येथील ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टर व आशा वर्कर उपस्थित होते.
विविध कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थित व हस्ते सर्व कार्यक्रम संपन्न झाले यावेळी विविध स्थरावरील पदाधिकारीनी कार्यक्रमास शोभा वाढवली तर कार्यकर्ते, कर्मचारी, भुजबळ समर्थकांनी परिश्रम घेतले. डॉ नंदलाल चौधरी यांचे मातोश्री हॉस्पिटल वडाळी येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. वरील सर्व कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले अपंग सेवाभावी प्रतिष्ठान महा राज्य संस्थापक तथा समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे यांनी केले होते.