आपला जिल्हा

आदरनिय छगनराव भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ५३ जणांनी केले रक्तदान सौ अश्विनी ताई भानवसे यांचा सामाजिक उपक्रम

वेळापुर /सोलापुर- ता.१५ | अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या ७४व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस सौ अश्विनीताई भानवसे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच ओबीसी नेते उत्तमराव जानकर याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक भगवान खारतोंडे विकास धाईजे, जिप सदस्य बाळासाहेब धाईजे, जि सदस्य किरण साठे, प स सदस्य अजय सकट, महादेव ताटे, बाबासाहेब माने, समता परीषद पदाधिकारी अमोल माळी, चंद्रशेखर जाधव यादी उपस्थित होते.

यावेळी ५३ लोकांनी आपली सामाजिक जाणीव म्हणून रक्तदान केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button