Rupali Chakankar- रुपालीताई चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड.
मुंबई – दि.१४ ऑक्टोबर | राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या प्रदेश अध्यक्षा रुपालीताई चाकणकर ( Rupali Chakankar) यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. (Rupali Chakankar elected as Chairperson of State Women’s Commission) महिलांच्या प्रश्नांवर सतत आक्रमक पवित्रा घेणाऱ्या रुपालीताई चाकणकर ह्या सतत कार्यक्षम असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर अनेक आंदोलने झालीत. राष्ट्रवादी महिला काँग्रेस – ला सक्षम करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
दौंडमधील शेतकरी कुटुंबात रुपालीताईंचा जन्म झाला. लग्नानंतर सासर असणाऱ्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे, रुपालीताई चाकणकर यांचाही राजकारणात प्रवेश झाला. आधी नगरसेविका त्यानंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्षा आणि आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.
याआधी या आयोगाच्या अध्यक्ष म्हणून विजय रहाटकर ह्या होत्या. त्यांच्या नंतर जवळपास दीड वर्षपासून हे पद रिक्त होतं. महिलांवरील वाढत्या अत्याचारामुळे विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर नेहमी टीका होत होत्या. त्यामुळे हे पद तात्काळ भरणे महत्वाचे होते. महिला व बालकल्याण खाते काँग्रेस कडे असल्याने या पदावर राष्ट्रवादीने दावा केला होता. त्यासाठी राष्ट्रवादीने या पदासाठी रुपाली चाकणकर(Rupali Chakankar), विद्या चव्हाण(Vidya Chavhan) आणि चंद्रा अय्यगार(Chandra Ayangar) या तीन नावांचा विचार केला होता. परंतु त्यातून आक्रमक नेतृत्व असणाऱ्या रुपालिताई चाकणकर याची निवड करण्यात आली.
रुपालिताई चाकणकर सतत कार्यक्षम असतात
महिलांच्या प्रश्नासह, सामाजिक, राजकीय प्रश्नावर नेहमी जागरूक राहून आग्रही व आक्रमक भूमिका नेहमी घेत असतात. त्या Social media वर नेहमी सक्रिय असतात. त्यांचा मुसद्दीपणा, करारीबाणा, सडेतोडपणा यामुळे त्या जवळपास दोन वर्षाच्या कमी कालावधीतच महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून मजल गाठू शकल्या.