आपला जिल्हा

छगनरावजी भुजबळ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाणा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

बुलडाणा- दि.१३ ऑक्टोबर | राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनरावजी भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रा सदानंद माळी राज्य सल्लागार अखिल भारतीय समता परिषद तथा संस्थापक अध्यक्ष योगीराज अर्बन यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये दिनांक १४ ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी ८ वाजता जिल्हा परिषद मराठी शाळा नाद्राकोळी येथे भव्य मुखरोग, दतरोग, व कोविड लसीकरण महाशिबिराचे आयोजन करण्यात आले असून यासाठी डॉ. जुबेर बागवान, डॉ.राजेशजी जतकर, डॉ.आशिषजी खासबागे रुग्णसेवा देणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री.संजुभाऊ काळवाघे, तर दलितमित्र माधवराव हुडेकर प्रमुख उपस्थिती म्हणून राहणार आहेत.

सकाळी ११:३० वाजता महात्मा ज्योतिबा फुले शाळा बुलडाणा येथे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश य शालेय साहित्य वाटप कार्यक्रम राहणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष मानकर सर तर पी.सी. चौधरी व इंजि. सुरेश चौधरी प्रमुख उपस्थिती म्हणून राहणार आहेत.

तर सायंकाळी ५ वाजता जिल्हा मराठी शाळा आदर्श गाव दत्तपुर येथे आरोग्य तपासणी शिबीराचे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे. यासाठी डॉ. सचिन झगडे हे रुग्णसेवा देणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तपुर गावचे सरपंच गजानन जाधव राहणार आहेत.

१५ ऑक्टोबर शुक्रवार ला सकाळी ९ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप कारण्यात येणार आहेत. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष डी. एस. लहासे सर आणि वसीम बागवान यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

दुपारी २ वाजता ग्रामदैवत रेणुका देवी पुजन व साडी चोळी अर्पण सोहळा चिखली रोड बुलडाणा येथे जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्रीताई शेळके आणि ज्योतिताई सदानंद माळी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी सदर कार्यक्रमासाठी नियोजित जागी नियोजित वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button