माजी आमदार पंकज भुजबळ यांच्याकडून नस्तनपूर मंदिरांत पूजा
नाशिक,दि.8 ऑक्टोबर | राज्यातील सर्व मंदिर उघडण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत करत नांदगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार पंकज भुजबळ यांनी नांदगाव मतदारसंघातील विविध मंदिरांमध्ये जाऊन पूजा केली. त्यांनी प्रथम प्रसिद्ध देवस्थान नस्तनपूर येथे ट्रस्टच्या वतीने मंदिराचे दरवाजे उघडत श्री शनीदेवाचे मंदिर भाविकांसाठी खुले केले. यावेळी त्यांनी आरती व पूजन करत दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी नांदगाव शहरातील एकविरा देवी मंदिर व मनमाड शहरातील नीलमणी गणपती मंदिरात पूजन करत दर्शन घेतले.
देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांहून अधिक काळापासून मंदिरे बंद होती. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता हळूहळू सर्व उद्योग, व्यवसाय पूर्ववत झाले असून शाळा देखील उघडण्यात आलेल्या आहे. त्याचपार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या वतीने घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र भरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या नेते व पदाधिकाऱ्यांकडून या निर्णयाचे स्वागत करत मंदिरांमध्ये पूजन करण्यात येत आहे.
त्या पार्श्वभूमीवर आज नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पंकज भुजबळ यांनी आज नांदगाव तालुक्यातील प्रसिद्ध नस्तनपूर मंदिराचे दरवाजे उघडून या निर्णयाचे स्वागत केले. तसेच यावेळी त्यांनी मंदिरात श्री शनिदेवाचे पूजन करत कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी नांदगाव शहरातील एकविरा देवी मंदिर व मनमाड शहरातील नीलमणी गणपती मंदिरात पूजन करत दर्शन घेतले.
यावेळी माजी आमदार अनिल आहेर, तालुका अध्यक्ष विजू पाटील, विनोद शेलार, नगरसेवक वाल्मिक टिळेकर, सोपान पवार, माजी नगराध्यक्ष बाळकाका कळंत्री, डॉ.वाय.पी जाधव, बबलू पाटील, हबीब शेख, बाळा देहाडराय, विश्वास अहिरे, राजेंद्र लाठे ,सचिन देवकते, मनोज कोरडे ,राजाभाऊ सावंत, शिवाजी कांदळकर, नारायण पवार, पंडित दादा, भाऊसाहेब सूर्यवंशी, गोरख जाधव, कारभारी पाटील, बोडखे पवार, शेषराव पवार, उदय आप्पा, तानसेन जगताप, पुंडलिक सदगीर ,सुनिल पवार, डॉ.निकम, कैलास गायकवाड, सुबोध थेटे, रमेश राठोड, योगेश गरुड, संदीप मवाळ, बाळू पवार , नरेंद्र महाजन, दत्तूनाना पवार, संपत पवार, पद्माकर महानुभाव, किशोर महाजन, दीपक खैरनार, मुकुंद खैरनार, सचिन जेजुरकर, गंगाधर जाधव, प्रताप पाटील, रामू पवार, अक्षय पवार, दया जुन्नरे, सुरेश गायकवाड, अशोक पाटील, शंकर विसपुते, किसनराव जगधने, गंगाधर जाधव, नंदू खैरनार इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.