Facebook Hacking Safety हि सेंटिंग केली तर फेसबुक हॅक होणार नाही.

आजकाल फेसबुक हॅकिंग होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील काही दिवसात बरेच लोकांचे फेसबुक, Massenger हॅक झाल्याचे दिसून आले. हॅक करून हे लोक आपल्या मित्र परिवाराला पैशांची मागणी करतात. परंतु ही फक्त पहिली स्टेप झाली. यापुढेही हे लोक आपल्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करू शकतात. आजकाल सोशल मीडियावर आपण आपला सर्वच वैयक्तीक डाटा शेअर करत असतो. या डाटा चा उपयोग करून हे लोक आपले बँक बलान्स पण रिकामे करू शकतात.
फेसबुक हॅक होण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी Two-Factor Authentication ऑन कसे करावे.
तर यासाठी फेसबुक मध्ये एक Dual Authentication (two-factor authentication) म्हणून ऑप्शन आहे ते ऑन करावे. जेणे करून कोणाला आपले अकाउंट हॅक करताना फक्त पासवर्ड वापरून हॅक करता येणार नाही. त्यासाठी पासवर्ड सोबत आपल्या मोबाईल नंबरवर येणारा OTP पण लागणार. आणि पासवर्ड आणि OTP दोन्ही हॅक करणे सोपे नाही.
हे ऑप्शन ऑन कसे करावे.
आपल्या Facebook App मध्ये जाऊन उजव्या वरच्या बाजूला तीन आडव्या रेषा दिसतात त्यावर क्लीक करावे.
त्यांनंतर खाली scroll करत Settings & Privacy मध्ये जावे. त्यानंतर त्याखाली Setting ऑप्शन वर क्लिक करावे.
त्यानंतर तुम्हाला Password and Security हे ऑप्शन मिळेल,
त्यात खाली आल्या नंतर Two Factor Authentication मध्ये Use two-factor authentication यावर क्लिक करावे. त्यानंतर two-factor authentication on करावे.
येथे तुम्हाला फेसबुक पासवर्ड टाकावा लागेल. ( जर आपण पासवर्ड विसरला असाल तर आधीच forgot password वरून नवीन पासवर्ड तयार करावा) तुम्हाला दोन ऑप्शन मिळतील पण तुम्ही Text massage(SMS) चा ऑप्शन निवडावा आणि नंतर तुम्हाला मोबाईल नंबर वर क्लिक करून Continue करायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला फेसबुक ला संलग्न मोबाईल नंबर वर OTP येईल तो एंटर करून Done करायचेआहे.तुमचे फेसबुक अकाऊंट वर आता two-factor authentication म्हणजेच dual authentication सुरू झाले आहे. म्हणजे आता कोणालाही फक्त पासवर्ड टाकून अकाउंट ओपन करता येणार नाही तर पासवर्ड सोबत OTP पण लागेल. आणि तो आपण कोणाला देणार नाही त्यामुळे आपण अकाउंट सुरक्षित झालं.
[ads1]
विशेष म्हणजे आपला पासवर्ड सुध्दा असा ठेवावा जो ट्रॅक होणार नाही. मोबाईल नंबर, जन्म तारीख, नातेवाईकांचे नाव, इत्यादी ठेवू नये, ते सहजासहजी ट्रॅक केल्या जाऊ शकतो. पासवर्ड मध्ये एक मोठं अल्फाबेट, एक छोटं, स्पेशल कारॅक्टर (#,@,₹,) आणि digit ठेवावे आणि पासवर्ड reguler बदलत रहावा.