बुलढाणा जिल्ह्यात सत्यशोधक समाजाचा वारसा. प्रा.हरी नरके यांनी उलगडला बुलढाणा जिल्ह्याचा इतिहास

मागासवर्गीयांना जागृत करून सर्व प्रकारच्या प्रबोधनाचे, परिवर्तनाची काम या देशात, गावखेड्यापर्यंत पोहोचून करणाऱ्या सत्यशोधक समाजाचा वारसा बुलढाणा जिल्ह्यामध्ये अतिशय जुना आहे. चिखली पासून बुलढाणा शहरापर्यंत आणि जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये यासंबंधीचे फार मोठे काम झाले आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी शेगाव येथील समता परिषद आयोजित प्रबोधन शिबिर केले.
ते पुढे बोलताना म्हणाले की या पैकी दोन उल्लेख महत्त्वपूर्ण आहेत
१) ताराबाई शिंदे
सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांची विद्यार्थिनी असणाऱ्या ताराबाई शिंदे वडिलांच्या सरकारी नोकरील बदलामुळे बुलढाणा शहरामध्ये वास्तव्यास आल्या होत्या. त्यांनी१८८२ मध्ये “स्त्री-पुरुष तुलना” नावाचे पुस्तक लिहिले. हे पुस्तक फक्त मराठी भाषेतील किंवा भारतातील नाही तर संपूर्ण जगातील पहिले स्त्रियांच्या प्रश्नावर चे पुस्तक आहे. स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाचे पुस्तकाचे भाषांतर इंग्रजी मध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या डॉ. रोझालीन हंग्लंड यांनी केले. सध्या हे पुस्तक हावर्ड, मँचेस्टर त्याचबरोबर जगातील अत्यंत महत्त्वाच्या अनेक विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे.
ताराबाई शिंदे या संपूर्ण जगातल्या पहिल्या स्त्रीवादी लेखिका त्या एका कुणबी परिवारातील मूळच्या पुण्यातल्या पण वडिलांच्या सरकारी नोकरीतील बदल्यांमुळे बुलढाण्यात आल्या. आणि त्यांनी १८८२ मध्ये बुलढाण्यात स्त्रियांच्या प्रश्नावरचे जगातील पहिले पुस्तक लिहिले. त्यामागची खरी प्रेरणा म्हणजे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची होती. कारण ताराबाई शिंदे या सावित्रीबाई फुले,महात्मा फुले यांच्या विद्यार्थिनी होत्या.
२) पंढरीनाथ सिताराम पाटील
चिखली मध्ये सत्यशोधक चळवळीचे काम मोठ्या प्रमाणात चालू होते. महात्मा फुलेंच्या जन्माला शंभर वर्षे पूर्ण झाली. म्हणून १९२७ आली पंढरीनाथ सिताराम पाटील यांनी महाराष्ट्रभर फिरून, महात्मा फुलेंच्या सहकाऱ्यांना भेटून, त्यांच्या आठवणी एकत्र केले आणि अतिशय दर्जेदार असे महात्मा फुले यांचे चरित्र प्रकाशित केली ते मूळचे चिखली येथील होते.
अशाप्रकारे खूप महत्वपूर्ण घडामोडींचा वारसा बुलढाणा जिल्ह्याला लाभला असल्याचे प्रा.हरी नरके यांनी सांगितले