आपला जिल्हा

१४८ व्या सत्यशोधक समाज वर्धापन दिनानिमित्त खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषद मोठया उत्साहात संपन्न

चाळीसगांव(भगवान रोकडे)- २६ सप्टेंबर |  १४८ व्या सत्यशोधक समाज वर्धापन दिनानिमित्त खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषद मोठया उत्साहात वैभव मंगलकार्यल भडगाव रोड चाळीसगाव येथे संपन्न झाली. सदर सत्यशोधक परिषद दोन सत्रात आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात सत्यशोधक समाजाच्या रीती रिवाज प्रमाणे खंडेरायाची तळी भरून करण्यात आली.

पहिल्या सत्राचे उद्घाटन मा. प्रतिभाताई शिंदे अध्यक्ष – लोक संघर्ष मोर्चा यांनी केले. त्यावेळी उदघाटनपर भाषणात त्या म्हणाल्या की “आजची ही परिषद महाराष्ट्रात होणाऱ्या क्रांतीची मुहुर्तमेढ झाली आहे.” पहिल्या सत्राचे अध्यक्षता करतांना  विश्वासराव पाटील अध्यक्ष गावरान जागल्या सेना यांनी शेतकऱ्यांना वजा उत्पन्न दाखला प्रश्न सोडविला आहे तसेच  शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला.

डॉ घाटविसावे यांनी “नवीन कृषि विधेयक शेतकऱ्यांचे नुकसान केल्याशिवाय राहणार नाही असे मत मांडत. या साठी सत्यशोधक पध्दतीने लढा हाच एकमात्र उपाय आहे.
सदर परिषदेत दोन ज्वलंत व राष्ट्रव्यापी विषयांवर चर्चा करण्यात आली. कृषी विधेयक आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०  हिताचे की अहिताचे.

तसेच दुसऱ्या सत्राच्या उद्घाटन प्रसंगी मा. बाळासाहेब कर्डक असे म्हणाले की, ही परिषद आधुनिक इतिहासाचे सोनेरी पान बनेल. वक्ते म्हणून डॉ. प्रशांत बोबडे सर यांनी नवे शैक्षणिक धोरण समजावून सांगितले. अध्यक्षता करतांना डॉ. प्रभाकर गायकवाड हे बोलले की, नवीन शैक्षणिक धोरण हे बहुजनांच्या  भविष्याचा जाहीर नामा आहे. यासाठी फुले शाहू आंबेडकरी यांनी स्थापित केलेले शैक्षणिक धोरण राबविल्याशिवाय पर्याय नाही.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथि म्हणून सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे यांचे पणतु गोपीनाथ लोखंडे हजर होते. उपस्थिती मध्ये डॉ. देवीदास शेंडे, बापूराव पवार गुरुजी, रामचंद्र जाधव, अशोकराव खलाणे,  दर्शनाताई पवार, धर्मभूषण नाना बागूल, डॉ. अशोकराव गोरे, ईश्वरभाऊ माळी, किशनराव जोर्वेकर, प्रा. संतोष विरकर,अनिल नळे आदी उपस्थित होते.

सदर परिषदेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातुन आणि विशेष करून खान्देशाच्या चारही जिल्ह्यातुन सर्व जाती धर्माचे सत्यशोधक बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन सत्यशोधक सुनील देवरे (रायगड) यांनी केले. पहिल्या सत्राची कार्यक्रमाची प्रस्तावना सत्यशोधक अरविंद खैरनार (औरंगाबाद) व दुसऱ्या सत्राचे प्रास्ताविक प्रा. गौतम निकम यांनी केली. सदर कार्यक्रमात सत्यशोधक संस्कृती संपूर्ण महाराष्ट्रात रुजविण्या संदर्भात एकमुखाने ठराव मंजूर करण्यात आला.[ads3]

तसेच सदर कार्यक्रमासाठी आयोजन समिती अध्यक्ष नानासो भीमराव खलाणे व कार्याद्यक्ष प्रा. गौतम निकम तसेच पूर्णकालीन प्रचारक म्हणून सत्यशोधक सुरेश  झाल्टे, सत्यशोधक भगवान रोकडे, सत्यशोधक कैलास जाधव, सच्चिदानंद जाधव,आबा पहिलवान, सुदर्शन जाधव,  राजकिशोर तायडे, आर्किटेक्ट नरेंद्र जाधव, आबा पगारे, आबासाहेब जेजूरकर व अरविंद खैरनार आणि संपूर्ण खान्देश स्तरातील सत्यशोधक बांधवांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button