माळी समाज राज्यस्तरीय युवक-युवती परिचय सम्मेलन शेगाव अध्यक्ष पदी विजय वावगे तर कार्याध्यक्षपदी गोपाल तायडे यांची निवड
खामगाव- दि. २७ | माळी समाज राज्यस्तरीय युवक-युवती परिचय संमेलन शेगावचे यंदाचे २८ वे वर्ष असून यावर्षी चे अध्यक्ष म्हणून विजय हरिभाऊ वावगे तर कार्याध्यक्ष म्हणून गोपाल तायडे यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात लोकसंख्येने दोन नंबर वर असणाऱ्या माळी समाजात विवाह जुळवणे खूप जिकिरीचे होऊन जाते. परंतु मागील २७ वर्षापासून शेगाव येथे समाजातील उपवर युवक युवती यांचे विवाह जुळावे या उद्देशाने राज्यस्तरीय महा संमेलनाचे आयोजन करण्यात येते. या संमेलनातून आतापर्यंत महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील आणि भारताबाहेर वास्तव्यास असणाऱ्या हजारो युवक युवतींचे विवाह जुळले आहेत. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी व रविवारी साजरा होणाऱ्या महा संमेलनात लाखो लोक सहभागी होत असतात. या संमेलनाच्या माध्यमातून समाजाचा वेळ पैसा व श्रम वाचत असतात.
यावर्षीचे २८ वे वर्षे असून संमेलनाची कार्यकारिणी निवडण्यासाठी रविवार दिनांक २६ सप्टेंबरला माळी भवन खामगाव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये मागील बऱ्याच वर्षापासून सतत कार्यरत असणारे विजय हरिभाऊ वावगे यांची अध्यक्षपदी तर गोपाल तायडे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
विजय वावगे हे या आधी २०११ मध्ये सहकोषाध्यक्ष, २०१२ मध्ये कोषाध्यक्ष, २०१४ मध्ये कार्यकारणी सदस्य, तर २०२१ मध्ये सचिव म्हणून कार्यरत राहीले आहेत. त्यांचे हे कार्य पाहून यावर्षीचे म्हणजे २०२२ चे अध्यक्ष म्हणून त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
यावेळी प्रल्हाद भाऊ बगाडे-अध्यक्ष माळी सेवा मंडळ खामगाव, तसेच माजी अध्यक्ष सर्व श्री बाळासाहेब बगाडे, सदानंदजी खंडारे, गजानन राऊत, तुकाराम निखाडे सर, प्रल्हाद भाऊ सातव, नामदेव राव बहादरे, दिनेश तायडे, रमेश भाऊ हिवराळे, राजेंद्र बोचरे, सुभाष जी निखाडे, रामेश्वर वावगे, ऑ शंकरराव वानखडे, उपस्थित होते.
कार्यक्रम साठी, उल्हास क्षीरसागर, विनायक जुमडे, विजय इंगळे, राजेंद्र भोपळे, श्रीकृष्ण खंडारे, विजय राखोंडे, अरविंद शिंगाडे, सुरेश बगाडे, अनंत सातव यांनी परिश्रम घेतले
कार्यक्रम चे संचालन प्रदीप सातव, प्रास्ताविक अजय तायडे तर आभार प्रदर्शन महादेव राव खंडारे यांनी केले.