आपला जिल्हा

कृषीदुतांनी दिली कृषि उत्पन्न बाजार समितीला भेट

खामगाव – २४ सप्टेंबर | श्री शिवाजी कृषि महाविद्यालय अमरावती येथील विद्यार्थी निशांत ज्योती अजय तायडे व सोहम संजय पांडे यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (Rural Awareness Work Experience) अंतर्गत कृषि उत्पन्न बाजार समिती खामगाव येथे भेट दिली.

याभेटी दरम्यान, त्यांनी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री. मुकुटरावजी भिसे साहेबांकडून बाजार समितीची कार्यपद्धतीबाबत व कृषी कायद्याबाबत सविस्तर चर्चा केली.
कृषि उत्पन्न बाजार समिती कशी शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरली आहे याची माहिती दिली. त्यानंतर बाजार समिती प्रत्येक्षात कशी काम करते हे बघण्याकरिता विद्यार्थ्यांनी समितीला भेट देऊन पाहणी केली.

सदर कार्यक्रमाकरीता प्राचार्य डॉ. नंदकिशोरजी चिखले सर, प्रभारी प्रा. आर. के.पाटील सर, कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. विरेंद्र डेरे सर आणि विषय तज्ञ सर्वश्री सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button