आपला जिल्हा

जिल्हा बँक प्रतिनीधी म्हणुन अजय काशिराम तायडे यांची सर्वानुमते निवड

खामगाव-१८ सप्टेंबर | ग्रामसेवा सहकारी संस्था काळेगाव ज्यामध्ये काळेगाव, ढोरपगाव, वडजी, भेंडी बेलखेड व कवडगाव या गावंचा समावेश आहे. ची आमसभा दि. १०/०९/२१ रोजी संपन्न झाली. यामध्ये जिल्हा बँक प्रतिनीधी म्हणुन अजय काशिराम तायडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .
तर तालुका खरेदी विक्री संस्था प्रतिनीधी म्हणुण सुभाष उत्तम अमलकार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी जेष्ठ सभासद भगवानसींग इंगळे, प्रल्हादराव जोहरी, श्रिराम सातव, महादेवराव वैतकार, दयाराम तांगडे, अविनाश तांगडे, समाधान निनाजी मुंढे, तोताराम मुंढे, महारु राठोड, रामराव पवार, ज्ञानदेवराव गायगोळ, रामभाऊ बगाडे, शंकरराव आटोळे, श्रिहरी तायडे, समाधान तांगडे,  राजाराम खेडकर, समाधान अमलकार, काशिनाथ बोचरे, अंबादास अमलकार यांचेसह सभासद सुभाष तांगडे, किसन राठोड, ज्ञानेश्वर रहाणे गणेश इंगळे गजानन अमलकार, श्रिराम अमलकार, शालीग्राम तायडे, प्रल्हाद तायडे, महादेव अमलकार, तुकाराम तायडे, विजय तायडे,  रामेश्वर रहाणे श्रिक्रुष्ण बोदडे, कैलास अमलकार, विलास इंगळे, राजेंद्र अमलकार, प्रकाश सोनोने, दशरथ चिम यांचे सह असंख्य सभासद हजर होते. तदनंतर नवनिर्वाचीत प्रतिनीधी अजय तायडे व सुभाष अमलकार यांचा सरपंच विलास इंगळे यांचे घरी कौंटुंबिक सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी  श्रिकांत तांगडे, श्याम गायगोळ, सुनिल आटोळे, अमोल खेडकर, प्रशांत अमलकार, पांडुरंग तायडे, विरेंद्र इंगळे, विजय बोचरे, श्रिक्रुष्ण तांगडे, ऊज्वल तायडे, पप्पु बोंडे, राजेंद्र सोनटक्के यांचेसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button