समाजव्यवस्थेला फाटा देत मुलीनेच दिला बापाला मुखाग्नी
चाळीसगाव(भगवान रोकडे)- १५ सप्टेंबर | पातोंडा येथील रामदास बारकु माळी व डाॅ. चुडामण बारकू माळी ( जाधव ) यांचे लहान भाऊ नामे, बापूराव बारकू माळी सर यांचे आज दि. १५ सप्टेंबर २०२१ बुधवार सकाळी अल्पषा आजाराने गणेश पार्क, टाकळी प्र चा; ता. चाळीसगाव येथे दु:खद निधन झाले.
त्यांना मुलगा नसल्याने त्यांनी मुलगा व मुलगी यात कधीच फरक केला नाही. मुलींनाच मुलाप्रमाणे वाढविले उच्च विद्याविभुषित केले नंतर मोठ्या उत्साहात दोन्ही मुलींचे लग्न समारंभ केले. तद्नंतर सासरी राहून सुध्दा मुला प्रमाणे आपल्या वडिलांच्या सुखा दुःखात सहभागी होऊन वडिलांची शेवटपर्यंत खुपच सेवा केली त्यांना कधीही मुलाची उणीव भासू दिली नाही.
आज अखेर त्यांच्या मुलीने आपल्या बापला दिला मुख अग्नी. त्यांच्या पश्चात दोन मुली मोठी सौ. सविता नारायण माळी रा. कोळगाव ता. भडगाव जि जळगाव व लहान सौ स्वप्नाली नरेंद्र खैरणार रा. मालेगाव जि नाशिक येथे वास्तव्यास आहेत. बापूराव बारकू जाधव माळी सर हे सेवा आश्रम विद्यालय मुरबे ता. जि. पालघर येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत होते.