आपला जिल्हा

संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाहेगाव साळ अकरावी विज्ञान शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न

नाशिक- १४ सप्टेंबर | महात्मा फुले सांस्कृतिक कला क्रीडा व शिक्षण संस्था संचलित संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाहेगाव साळ अकरावी विज्ञान शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न.
संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाहेगांव साळ येथे सोमवार दिनांक 13/9/2019 रोजी अकरावी विज्ञान शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्यांचा फुल श्रीफळ शाल देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे ऊद्घाटक माननीय श्री भाऊसाहेब आहिरे प्रोप्रायटर दत्त मंगल स्टील मालेगांव यांच्या शुभहस्ते विज्ञान शाखेचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री अंबादास बच्छाव सर मालेगांव हे होते.


  1. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री बबनराव न्याहारकर हे होते कार्यक्रमाच्या मान्यवरांनी शाळेचे भरभरून कौतुक केले याप्रसंगी शाळेला लागेल ती मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले कार्यक्रमास गांवचे प्रतिष्ठित नागरिक सरपंच केशव खैरे यांनी पण शाळेसाठी ग्रामपंचायतीकडून मदत करणार असल्याचे सांगितले, उपसरपंच सीमाताई न्याहारकर पोलीस पाटील दिपक खैरे गांवकरी मंडळी व संत जनार्दन स्वामी विद्यालय गंगावे चे अध्यक्ष सुनील शेलार हे उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष एन.एस.मंडलिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर संस्थेचे सर्व संचालक मंडळ बाजीराव खैरे ,भारत खैरे,विश्वासराव आहेर,वसंतराव खैरे,पोपटराव सोमवंशी, चिंधु खैरे, एन.एस. मंडलिक, अरुणराव पुंड, पोपटराव खैरे,नवनाथ पवार, बाबुराव शिंदे, अण्णासाहेब, मंडलिक सर्व संचालक मंडळ गावातील सर्व ग्रामस्थ मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button