ओबीसी चळवळ

लढाई विचारांची, एल्गार ओबीसीचा – प्रा. विठ्ठल तळेकर

ओबीचहोय मी ओबीसी यात कमीपणा कसला.
ज्या कुळात ज्या समाजात जन्म झाला त्या जातीचा अभिमान वाटावा असाच इतिहास आहे.

पण हल्ली लोकांची जात लपवण्यासाठीची धडपड आहे.
मान्य आहे जातीव्यवस्था नष्ट झाली पाहिजे त्यास आम्ही तयार आहोत.

पण वायवस्थेने आम्हाला माणूस म्हणून तरी आमचा विचार करावा.
मतपेटीचे म्हणाल तर हिंदू मतदार म्हणून तरी आम्ही माणूस आहोत हा विचार करावा ?
कुत्र्या मांजराची, गायी, म्हशी, गाढवाची सुद्धा गणना होते मग
व्यवस्थेने आम्हाला हे सांगावं आम्ही आहोत कोण ? पशु की मानव ?

देशभरात ओबीसी बहुल आहे. पण परखड पणे ओबीसी म्हणून बाहेर पडलो, तर माझे कसे होईल मला लोक काय म्हणतील ? मग मला मतदान करतील का नाही ? मला वेगळे पडतील का ? हा समज की गैरसमज ?
तुम्ही तुमच्या अस्मिते साठी पुढच्या पिढीसाठी आवाज उठवला, तर यात राजकारण कसले ?
तुम्ही कोणाला तरी विरोध म्हणून नाही तर भविष्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी लढा देताय !

तुमचा गैरसमज दूर करण्यासाठी काही उदाहरणे रामदास आठवले, छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे, महादेव जानकर, विनायक मेटे, संभाजी राजे भोसले, उदयनराजे भोसले, याना ही समाजाने निवडुन दिलेच ना ! मग हे वरिल सर्व वेगवेगळ्या समाजाचे प्रतिनिधित्व करतातं पण सर्व समाजाने स्वीकारलेचा ना ?
मग आपण आपल्या गैरसमज डोक्यात घेऊन उघड भूमिका का घेत नाहीत ?

एकट्या भुजबळांच्या खांद्यावर ओबीसीचा भार देऊन
तुम्ही काय सिद्ध करणार. आज जिथे दगड उचलावा तिथे ओबीसी चे नेते सापडतील.
एक ना धड भाराभर चिंध्या. अशीच काहीशी गत ओबीसी ची झाली.
सगळे करायचे भुजबळांनी ! मग तुम्ही काय कपडे सांभाळणार का ?
ओबीसी ची भूमिका घेतली की चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लावला जातो.

आज राष्ट्रवादी चे इतर ओबीसी नेते असो व इतर पक्षातील, भाजप मधील,
भूमिका सर्वानी घेणे गरजेचे आहे. पक्षाचे जोडे बाहेर ठेऊन भूमिका घेणे आवश्यक आहे.

14 ओबीसी चें समाजाशी नाळ तुटलेला लोक मंत्री म्हणून दिले.  म्हणजे ओबीसी ना न्याय मिळाला असे होत नाही.
ओबीसी च्या मूलभूत मागण्या तरी काय आहेत ?
एक जातनिहाय जनगणना.
दुसरी स्थानिक स्वराज्य संस्था मधील आरक्षण.
वैद्यकीय कोटा अबाधित राहावा.

यासाठी तुमच्याकडे बहुमत आहे, मग तरी हे मंत्री का ओबीसी जातनिहाय जनगणनेची मागणी करत नाहीत ? हे प्रश्न आहे प्रत्येकाला पडायलाच हवा

होय मी ओबीसी
माझा लढा जातनिहाय जनगणना

लेखक- प्रा विठ्ठल तळेकर- परभणी
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद
+91 97630 24803

दि-०७ सप्टेंबर२०२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button