खान्देश स्तरीय सत्यशोधक परिषदेची चाळीसगावला बैठक संपन्न
चाळीसगाव(भगवान रोकडे) : ०६ सप्टेंबर | राष्ट्रपिता महत्मा जोतिराव फुले प्रेरीत सत्यशोधक समाज स्थापना दिनाच्या १४८ व्या वर्धापन दिनानिमित्त खान्देश स्तरीय सत्यशोधक परिषदेचे आयोजन २६/०९/२०२१ रविवार रोजी चाळीसगाव येथे करण्यात आले असून सदर आयोजन समितीची बैठक शासकीय विश्रामगृह चाळीसगाव येथे नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत खान्देश स्तरीय सत्यशोधक परिषदेचे पत्रक प्रसिध्द करण्यात आले.
या खान्देश स्तरीय सत्यशोधक परिषदेचे आयोजन समितीचे अध्यक्ष मा. नानासो. भिमराव हरी खलाणे व आयोजन समितीचे कार्याध्यक्ष मा. प्रा. गौतम निकम सर यांच्या हस्ते खान्देश स्तरीय सत्यशोधक परिषदेचे पत्रक प्रसिध्द करण्यात आले.
या प्रसंगी आयोजन समितीचे सदस्य अरविंद खैरनार, सुरेश झाल्टे, भगवान रोकडे, कैलास भगवान जाधव, मुकेश नेतकर, सुरेंद्र महाजन, आप्पा फिटर महाजन, प्रशांत महाजन सर, देविदास महाजन, चेतन महाजन इत्यादी उपस्थित होते.