आपला जिल्हा

काँग्रेस कमिटी लीगल सेल जिल्हाध्यक्ष (शहर) पदी अँड. श्रीकांत नागरीकर यांची नियुक्ती

अमरावती- ०३ सप्टेंबर | सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे, तसेच विविध सामाजिक संघटनेत सक्रिय असणारे अँड. श्रीकांत नागरीकर यांची नुकतीच काँग्रेस कमिटी अमरावती  जिल्हाध्यक्ष (शहर )लिगल सेल पदी नियुक्ती करण्यात आली.

अँड. श्रीकांत नागरीकर यांची नियुक्ती माजी राज्य मंत्री श्री सुनीलभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनात कॉंग्रेसचे अमरावती जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ शेखावत यांनी केली. यावेळी काँग्रेस कमिटी प्रदेश सरचिटणीस किशोरभाऊ बोरकर, विलासभाऊ इंगोले, जेष्ठ बंधु श्री मनोजभाऊ भेले, वकील सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍड झिया खान सर, इत्यादी उपस्थित होते.

अँड. श्रीकांत नागरीकर हे व्यवसायाने वकील असून माळी समाज बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र चे प्रदेश अध्यक्ष, क्रांतिसूर्य माळी महासंघाचे कोषाध्यक्ष, सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष आहेत तसेच विविध सामाजिक संघटनेचे ते सक्रिय सदस्य आहेत, या माध्यमातून ते शोषित, पीडित, अन्यायग्रस्तांना नेहमी न्याय मिळवून देत असतात. त्यांच्या या निवडीने सामजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून योग्य व्यक्तीची निवड झाल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button