ओबीसी चळवळदेश-विदेश

ओबीसी आरक्षणासाठी शरद यादव यांचे मोलाचे योगदान, ओबीसींचे देशातील नेतृत्व छगन भुजबळ यांनी करावे आम्ही त्यांच्यासोबत शरद यादव यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली, दि.२९ ऑगस्ट |आपल्या संघर्षमय जीवनात शरद यादव यांनी ओबीसी समाजासाठी रचनात्मक कार्य केले आहे. ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोलाचे योगदान शरद यादव यांनी दिल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले. दिल्लीतील कॉन्स्टिट्युशनल क्लबमध्ये झालेल्या ओबीसी महासंघाच्या कार्यक्रमात भुजबळ बोलत होते.

ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शरद यादव यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिल्लीत कार्यक्रम आयोजित करून महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शरद यादव यांचा सत्कार केला

 

शरद यादव यांनी ओबीसी वर्गाला आरक्षण मिळावे यासाठी केलेली मोर्चेबांधणी आजही आम्हाला माहीत आहे. शरद यादव यांनी अगदी न्यायालयीन लढाई पासून आंदोलन करण्यापर्यंत महत्वाची भूमिका निभावल्याची आठवण छगन भुजबळ यांनी करून दिली. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करताना झालेल्या विविध गोष्टींवर देखील छगन भुजबळ यांनी सविस्तर भाष्य केले.

आपल्या भाषणात शरद यादव म्हणाले की ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देताना आम्ही मोठा संघर्ष केला यात शंका नाही पण आता ओबीसी आरक्षणावर निर्माण झालेल्या प्रश्नांवर देखील मोठा लढा दिला पाहिजे. आणि या देशव्यापी आंदोलनाचे नेतृत्व छगन भुजबळ यांनी करावे. छगन भुजबळ यांनी देखील ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष केला आहे त्यामुळे आता देशव्यापी लढा त्यांनी उभारावा आम्ही त्यांच्या सोबत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button