आपला जिल्हा

विशाल महाराज गडगे यांची संत सावता माळी युवक संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

अकोला : २८ ऑगस्ट | सामाजिक कार्यकर्ते विशाल महाराज गडगे यांची श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून नुकतेच त्यांना निवडीचे पत्र संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड, राज्य सचिव सुनिल गुलदगड व प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांच्या हस्ते पुणे येथील संघाच्या विभागीय बैठकीत प्रदान करण्यात आले.

 

विशाल महाराज गडगे यांनी यापूर्वी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष पद भूषविले असून कार्यकाळात माळी समाज वधू-वर सूचक मेळावे, महात्मा दिनानिमित्त अन्नदान, वृध्दाश्रमांना आर्थिक सहकार्य, समाजातील प्रसंशनीय व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांसाठी दरवर्षी संत सावता महाराज कार्यगौरव व महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन आदी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. तसेच समाजातील विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासनदरबारी सातत्याने प्रशासकीय पाठपुरावे केले आहेत. सामाजिक बांधिलकीची जाणीव जोपासत समाजकार्य करणाऱ्या एका सच्चा व उमद्या कार्यकर्त्याची माळी समाजाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल विशाल महाराज गडगे यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

या निवडीचे स्वागत श्री संत सावता माळी युवक संघ अकोला जिल्हा अध्यक्ष अजय मुरलीधर बंड, उपाध्यक्ष गौरव अढाऊ, जिल्हा संप्रक प्रमुख रविराज शेवालकार यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button