ओबीसी चळवळ
इंपिरिकल डाटा संदर्भात केंद्र सरकारने मागितला तीन आठवड्यांचा वेळ
केंद्राने इंपिरिकल डेटा द्यावा यासाठी राज्य शासनाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पार पडली सुनावणी
मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
नवी दिल्ली :- २४ ऑगस्ट | ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी इंपिरिकल डेटा आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारने असलेली ओबीसींची सामाजिक व आर्थिक जनगणनेची माहिती राज्य शासनास उपलब्ध करून द्यावी यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली यात केंद्रसरकारने आपली बाजू मांडण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी मागून घेतला असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्य सरकारच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. त्यांनी यावेळी महाराष्ट्रात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळे कोर्टाने यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे मत मांडले. तर केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली आणि यावर उत्तर देण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ मागून घेतला.












