आपला जिल्हा

ओबीसी आरक्षणासाठी एक दिलाने रस्त्यावर उतरण्याची वेळ-अनिल नळे.

मांडका येथे समता विचारांची बैठक संपन्न.

खामगाव- १६ ऑगस्ट | तालुक्यातील मांडका येथे समता परिषद संघटक माननीय श्री अनिलजी नळे यांच्या प्रमुख उपस्थितीत समता विचारांची बैठक संपन्न झाली.


फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर काम करणारे अ.भा.म.फुले समता परिषद ओबीसी जनजागृती अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबवीत असून त्यासंदर्भात अनिलजी नळे हे आज विदर्भ दौऱ्यावर असल्यामुळे त्यांनी महात्मा फुले प्रेमींसाठी मांडका गावाला भेट दिली

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनिल नळे यांनी महात्मा फुले यांच्या पुतड्याला मालार्पण केली, यावेळी गावचे सरपंच रमेश खंडारे यांनी अनिलजी नळे यांचे शाल श्रीफळ व पुष्पहार घालून स्वागत केले,

अनिलजी बैठकीला संबोधित करताना म्हणाले की, सध्या ओबीसी आरक्षण धोक्यात असून आपण त्यासाठी रस्तावर उतरण्याची वेळ आली आहे. आरक्षण ही संकल्पना समजणे महत्वाचे आहे, फुले-शाहू-आंबेडकर समजून घेणे महत्वाचे आहे. यासाठी समता परिषद राज्यभर प्रबोधन शिबीर राबवित असून जिल्हा आणि तालुका निहाय प्रबोधन शिबिर घेतली जाणार आहेत तरी तमाम ओबीसी समाजातील बांधवांना ह्या शिबिरांना सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जगन्नाथ खंडारे, महादेव खंडारे,उल्हास क्षिरसागर, अनिल वानखडे, नरेश वानखडे, जयराम बोचरे, अनिल क्षिरसागर, खुटपुरी येथील प्रकाश दांडगे, यशवंत गवळी, गोंधनापूर येथील प्रदीप निमकर्डे, दिनेश निमकर्डे, तसेच पंचक्रोशीतील फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचे कार्यकर्ते व समता परिषद कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते, शेवटी संतोष बोचरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button