आपला जिल्हा

इंपिरिकल डाटा संदर्भात केंद्र सरकारला बाजू मांडण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश-मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

Supreme Court orders central government to side with Imperial data

केंद्राने इंपिरिकल डेटा द्यावा यासाठी राज्य शासनाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पार पडली सुनावणी

मंत्री छगन भुजबळ यांची माहित

ओबीसी वर्गाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी इंपिरिकल डेटा आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडे असलेली ओबीसींची सामाजिक व आर्थिक जनगणनेची माहिती राज्य शासनास उपलब्ध करून द्यावी यासाठी आज राज्य शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली असून यात केंद्रसरकारला आपली बाजू मांडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.राज्य सरकारच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली.

कायदेशीर बाबींच्या पुर्ततेअभावी स्थगित झालेल्या ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकार चहू बाजूने प्रयत्न करत आहे.आरक्षण पूर्ववत करण्यासाठी अत्यंत गरजेचा असलेला इंपिरिकल डाटा हा केंद्राने द्यावा यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली त्यावर आज सुनावणी पार पडली.दि २४ ऑगस्ट ला या याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे आहे.तोपर्यंत इंपिरिकल डाटा संदर्भात केंद्र सरकारला बाजू मांडण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहे.

आज सर्वोच्च न्यायालयातील राज्य सरकारच्या याचिकेवर सुनावणी झाली. ज्या सर्वोच्च न्यायालयाने आधी केंद्रीय डेटाबद्दल आदेश द्यायला नकार दिला होता त्याच न्यायालयाने आज मात्र आठ दिवसात केंद्र सरकारने आपले म्हणणे सादर करावे असा आदेश दिला. ही मोदी सरकारला चपराकच आहे. राज्याने याचिका दाखल करून ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित करण्याबाबत उचललेले हे पाऊल उचित होते हेच यातून स्पष्ट होते.

प्रा हरी नरके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button