ओबीसी चळवळ

महाज्योतीच्या ज्ञानाचा प्रकाश ओबीसी भटके जाती जमाती आणि बहुजनांच्या जीवनात ज्ञान, कौशल्य आणि समृध्दीचा प्रकाश घेवून येवो!

महाज्योतीच्या ज्ञानाचा प्रकाश ओबीसी भटके जाती जमाती आणि बहुजनांच्या जीवनात ज्ञान, कौशल्य आणि समृध्दीचा प्रकाश घेवून येवो!
महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योतीची निर्मिती ही अनेक दशकानंतर ओबीसींच्या सर्वांगीण विकासासाठी निर्माण झालेली संस्था आहे. या संस्थेच्या निर्मितीमधे सत्तेमधील राजकीय ओबीसी नेत्यांचा जेवढा सहभाग आहे, त्यापेक्षाही, ओबीसी विद्यार्थी संघटना, ओबीसी चळवळीतील कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. महाज्योतीच्या कार्य प्रणालीमधे ज्या काही त्रुटी असतील, चुकाही असतील, त्या आम्ही मान्य करतो, कारण त्याचे वस्तुनिष्ठ मुल्यमापन झाल्याशिवाय नवी प्रगतीशील आणि विद्यार्थी लोकाभिमुख कार्य महाज्योतीला करता येणार नाही. सर्वांच्या सुचनांचा आदर करून, महाज्योती चा संचालक म्हणुन ओबीसी,भटक्या जातीजमातीच्या उत्थानासाठी निरंतर कार्य करीत राहु! आज महाज्योतीच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त महाज्योतीच्या योजनेतील सर्व ओबीसी विद्यार्थ्यांना, ओबीसी भटके जाती जमाती मधील वंचीत बहुजनांना , महाज्योतीच्या सर्व हितचिंतकांना,टिकाकारांना, महाज्योतीचे मा. अध्यक्ष, संचालक, अधिकारी वर्ग आणि कर्मचार्‍यांना हार्दिक शुभेच्छा!

प्रा. दिवाकर गमे
संचालक
महाज्योती, नागपुर

Back to top button